‘हरवले मन माझे’ रोमॅंटिक म्युझिक अल्बम रसिकांच्या भेटीला …

Entertainment
1 min readFeb 29, 2020

--

व्हेलेंटाईन वीक नुकताच सर्वांनी साजरा केला. या निमित्तानेच प्रेमावर आधारित स्वराज्य फिल्म प्रोडक्शन निर्मित ‘हरवले मन माझे’ हे गाणे रसिकांच्या नुकतेच भेटीला आले असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडियन आयडॉल उपविजेता सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांनी हे गाणं गायलं असून गाण्याचं संगीत कुणाल आणि करण यांचे आहे, तर अर्जुन गोरेगावकर, शिल्पा ठाकरे, शिल्पा तुळसकर, सविता हांडे, स्नेहल भुजबळ, श्याम दंडवते यांच्यावर ते चित्रित झालं आहे.

निसर्गरम्य लोकेशन्सवर खुलणाऱ्या या ही प्रेम गीताचे दिग्दर्शन धनंजय साबळे यांनी केलं असून, सिनेमॅटोग्राफी मिलिंद कोठावळे यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे या गाण्यासाठी ड्रोनचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे. रसिकांचा गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आनंद आनंद वाटत असल्याची भावना यावेळी गीताचे निर्माते उमेश माने,अर्जुन गोरेगावकर, गणेश शिंदे यांनी व्यक्त केली.

--

--

No responses yet