सकारात्मकता वाढवण्यासाठी “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ “ गाणे प्रदर्शित . . .

Entertainment
2 min readApr 25, 2020

--

Punha Ekda Garud Bharari Gheu

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमद्धे भीतीचे वातावरण पसरले आहे, इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची सध्या संख्या कमी असली तरीदेखील हा आकडावाढतच चालला आहे, याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनामद्धे नकारात्मकता वाढत आहे. याच धर्तीवर लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक कलावंतांनी एकत्र येऊन “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” हे नवं कोरं गाणं रसिकांसमोर आणलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण हे दोन्ही सर्व कलाकारांनी घरातून मोबाईलच्या साहाय्याने केले असून, तांत्रिक बाबींच्या साहाय्याने शक्य तितकं स्टुडिओ ध्वनिमुद्रणाच्या बरोबरीचं करण्याचा प्रयत्न केला आहे.

गाण्यात दीपाली सय्यद, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, नितीश चव्हाण, स्मिता शेवाळे, देवदत्त नागे, किरण गायकवाड असे दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. गाण्याचे दिग्दर्शन व संकलन मकरंद शिंदे यांनी केले असून, संगीत जीवन मराठे यांनी दिले आहे, गाण्याचे शब्द वैशाली मराठे, सुरेखा मराठे, शौनक कंकाल यांचे असून हे जीवन मराठे, कविता राम, राजेश्वरी पवार, क्रिशा चिटणीस यांनी गायलं आहे. या गाण्याचे संगीत संयोजन, म्युझिक प्रोग्रामिंग आणि गिटार ऋषभ खासनीस आणि बासरी शुभम चोपकर यांनी केली आहे. तर पोस्टर अनिल शिंदे यांनी बनवलं आहे. गाण्याची संकल्पना अभिनेत्री दीपाली सय्यद यांची असून हे गाणं रसिकांसमोर आणण्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल घोडके, राजेंद्र अनासपुरे यांनी पुढाकार घेतला.

याप्रसंगी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या कि “कोरोनामुळे लोकांमद्धे भीतीचे वातावरण आहे, वाढत्या लॉकडाऊन मुळे, सतत घरात राहून नकारात्मकता वाढू शकते, या गाण्याच्या माध्यमातून लोकांमद्धे सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा आम्हा सर्व कलावंतांचा प्रयत्न होता, लोकांना नक्कीच तो आवडेल अशी आम्हाला खात्री आहे”. कलावंतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गाणे रसिकांसमोर आणले असून लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

https://youtu.be/FkvIYsa61_0

--

--

No responses yet