महाराष्ट्राची डॉल श्रद्धा पवारच्या “माझी बायगो” गाण्याला शंभर मिलियन व्ह्यूव्ज …

Entertainment
2 min readMar 13, 2022

--

Shraddha Pawar

सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करत यश मिळवणाऱ्या, स्वतःचं विश्व समृद्ध करणाऱ्यांमध्ये आघाडीचं नाव म्हणजेच श्रद्धा पवार, महाराष्ट्राची डॉल या नावाने देखील ती प्रसिद्ध आहे, श्रद्धाचे सगळेच व्हिडियो जबरदस्त व्हायरल होत असून तिचं “माझी बायगो” हे गीत शंभर मिलियन व्हीवच्या घरात पोहोचलं आहे. मूळची उल्हासनगरमध्ये राहणारी, सर्वसाधारण घरातली एक गोड मुलगी आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तिचा अभिनय असणारी “गर्लफ्रेंड नसताना”, माझं फर्स्ट लव्ह, झूठा प्यार है तेरा अशी अनेक गाणी सोशल मीडियावर प्रचंड हिट असून त्यांचे व्हिव देखील मिलियन च्या घरात आहेत.

सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या श्रद्धाकडे सुरवातीला शुटिंग करण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. गॅलरीत उन आलं की ती पिठाचा डबा गॅलरीत ठेवायची आणि त्या डब्यावर एक इस्त्री ठेवून त्याचा उपयोग मोबाईल स्टॅण्डसारखा करायची.अशातच लॉकडाऊन च्या काळात तिने एक व्हिडियो बनवला आणि तो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला. यानंतर लगेचच पुढच्या एक- दोन दिवसात तिने बनवलेले ‘पाया मैने पाया, तुम्हे रबने बनाया..’ आणि ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा…’ असे दोन व्हिडियो बनविले आणि ते ही सोशल मिडियावर तुफान चालले. अवघ्या काहीदिवसांमध्येच तिच्या व्हिडियोंना प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आणि तिचे फोल्लोवेर्स देखील मिलियन च्या घरात पोहोचले.

आजवरच्या प्रवासाबद्दल श्रद्धा सांगते कि “खूप स्वप्नवत वाटतं ज्या आयुष्याचा कधी विचारच केला नव्हता, आज ते आयुष्य जगायला मिळत आहे. बाहेर गेल्यानंतर मला अनेक लोक भेटतात माझी गाणी, व्हिडीओ आवडल्याचे सांगतात, माझी गाणी लावतात, माझ्यासोबत फोटो घेतात, हे अनुभवताना खूप मज्जा येते. भविष्यात श्रद्धाला चित्रपटांत काम करण्याची देखील इच्छा असल्याचं ती सांगते त्यासाठी ती सध्या तिच्या अभिनयावर प्रचंड मेहनत घेत आहे.

--

--

No responses yet