ढोलकीच्या तालावर फेम सायली पराडकरचं ‘मिशीवाला पाहुणा’ हिट …

Entertainment
1 min readJul 15, 2019

--

Sayali Paradkar

ढोलकीच्या तालावर फेम सायली पराडकरचं ‘मिशीवाला पाहुणा’ हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं असून, चाहत्यांकडून सायलीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हे गीत ‘छत्रपती शासन’ या चित्रपटातील असून गायिका जान्हवी प्रभू-अरोरा हिच्या भन्नाट आवाजात ‘मिशीवाला पाहुणा’ हे गाणं रेकॉर्ड झालं आहे. या आयटम सॉंगचं संगीत दिग्दर्शन रोहित नागभिडेचं आहे तर गण्याला डॉ विनायक पवार यांनी शब्दबद्ध केलं आहे. सिनेमातील चारही गाणी वेगळ्या धाटणीची आहेत. विशेष म्हणजे सिनेमातील प्रत्येक गाण्याचं संगीत दिग्दर्शन वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांनी केलं आहे.

प्रबोधन फिल्म्स आणि सवाई मार्तंड निर्मित आणि खुशाल म्हेत्रे दिग्दर्शित ‘छत्रपती शासन’ सिनेमा उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले, खुशाल म्हेत्रे यांची निर्मिती आहे. आजच्या तरुणाईला हा चित्रपट शिवशाही बद्दल अचूक मार्गदर्शन करणारा आहे. नुकताच या सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. या प्रसंगी सिनेमाचे दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे यांनी या सिनेमाच्या निमिर्तीचा आणि दिग्दर्शनाचा प्रवास अतिशय मनोरंजनात्मक पद्धतीने मांडला. महाराजांचे आयुष्य १८३०६ दिवसांचे होते, त्यातून नेमके काय शिकायचे? काय बोध घ्यायचा? या पडलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच छत्रपती शासन हा चित्रपट आहे.

प्रतिकांची, प्रतिमांची, पुतळ्यांची पूजा करण्यापेक्षा किंवा जय शिवाजी जोशात म्हणण्यापेक्षा शिवाजी महाराज नक्की काय म्हणतात हे सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटामार्फत केला गेला आहे. छत्रपती शासन सिनेमाच्या एकूण उत्पन्नाचा १० टक्के भाग हा भारतीय सेनेला देण्यात येणार आहे अशी घोषणा सह निर्माते अमर पवार यांनी या वेळेस केली.

--

--

No responses yet